प्रेम, व्यावहारिकतेचे एकांतात बसल्यावरच तुझा सहवास मिळतो, दररोजच्या धावपळीत आपल्याला स्वतःचाच पत्ता नसतो! तुझेही असेच असेल तर, वाईट वाटून घेऊ नकोस. पुस्तकी प्रेमाचा भाग कवटाळून बसू नकोस! आठवतं तुला, आणाभाका कधीच आपण घेतल्या नव्हत्या. दुनियेच्या रितिभाती जणू यौवनात जाणल्या होत्या! वाट तुझी आताशा मी बघत नाही, संसारात रमल्यावर म्हणे कशाचीच गरज लागत नाही. कधीतरी जेंव्हा रिते व्हावेसे वाटते माझ्या मनाला, परत जाऊन खेटून बसतो मी बागेतल्या बाकाला! -गोसाव्यांचा योगेश २९ मार्च, २०२२