काल, १२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती, बऱ्याच थोड्या जणांना माहित असेल! कारण काल एक ही चैनल वर ही न्यूज़ आली नाही मग आपल्या सारख्या लोकांना कस माहित होणार? बरोबर ना? असो! स्वामिंच्या पत्रां मधील काही भाग माझ्या वाचनात आला होता आणि काल त्यांच्या जयंती निमित्त पुन्हा तो भाग वाचनात आला, विचार केला तो तुम्हां सर्वांना देखिल माहित असावा त्या साठी आजचा हा लेख. स्वामिंच्या मते, "सत्ता ही चार प्रकारचे लोक (वर्ण) चालवतात. प्रत्येक प्रकारचे काही फायदे आहेत तसे काही तोटे ही आहेत. १. ब्राम्हण ह्या लोकांच्या शासन व्यवस्थे मधे समाज वंश परम्परेवर आधारलेला असतो. त्यांचे आणि त्यांच्याच वंशाच्या लोकांचे हित सम्बन्ध जपले जातात. ज्ञान संपादन आणि दान दोन्ही त्यांच्याच मर्जिने चालते प...