Skip to main content

Posts

Showing posts from 2019

सफर

सफर उभरता साल पता नहीं सबको क्यों अच्छा लगता है? दिन मेरा पहला, गुजरते साल की याद में तड़पता है। दे जाता है कितनी अनोखी यादें, बातें और लोग। निकल जाता हैं चुपचाप दबे पाँव, बिना किये शोर। आनेवाला शोर करते आता है, दो दिन में वो भी पुराना सा लगता है। सफर जारी रहेगा यूँही, जबतक आप थकते नहीं। फिर भी नया साल का स्वागत करते आप रुकते नहीं। रुको, थोडा ध्यान तो दो। जानेवाला क्या दे गया, थोड़ा सोच तो लो। सफर तुम्हारां हो आसान यहीं है दुआ यारों। चलता रहे सफर निरंतर मेरी यहीं शुभकामनाएं प्यारों। -योगेश गोसावी १ जनवरी, २०२० 

स्री या पुरुष

स्री या पुरुष समंदर की येे लेहरें पता नहीं क्या कह रही है? पैर छूकर बुला रही है, या थोड़ा दूर धकेल रही है? पुरुष ही है ये सागर, जीनसे ये आती है। किनारे पे आते आते ये औरत क्यूँ केहलाती है? क्या बताती है ये कायनात, कुछ समझ नही आता! स्री से बनता है ये नर, या नर से आती हैं ये नारियां? या फिर है ये उसीकी कोई सोची समझी साजिश, जो बताती है दोनों से ही बनती है दुनिया? शायद सोच है अपनी अपनी, कोई साजिश नहीं, प्यार पे ही टिकी है दुनिया दूसरा कोई राज़ नहीं! -योगेश गोसावी २९ दिसम्बर, २०१९

शोर यादोंका

शोर यादोंका रात के सन्नाटेमें भी एक अलग शोर होता है, यादों के झगड़े सुननेका एक आलम होता है। कुछ चिखती हुई दिल देहला देती है, कुछ ख़ामोशसी उसी को सेहलाती है। झगडती है एक दूसरे साथ, पर निंद भाग जाती है। आप थक न जाओ तबतक ये कहा किसीका सुनती है। सुलह करलो उनसे तो थोड़ा सुकून मिल जाये। शोर करती ये यादें फिर हर रात रंगीन बनाये। -योगेश गोसावी २५ दिसम्बर, २०१९

बचपना जवानी का!

बचपना जवानी का! लगता है मैं अब भी बच्चा हूँ, इंतज़ार करने में थोड़ा कच्चा हूँ। अपनी दुनिया के कायदे तुम हमें ना बताना, रियासत का अपनी हूँ मैं इकलौता शहजादा। होगा थोड़ा मुश्किल तुम्हें हम से यूँ उलझना, ना कर पायेंगे हम कोई भी वफ़ा किसीसे दोबारा। लुटाने गर आये हो तो लूट ही जायेंगे, लेने गर आये हो तो बस यादें ही दे पायेंगे। हो मंजूर तो ईस बच्चे को ना और सताना, लूटो और भर जाओ अपनी यादों का खजाना! -योगेश गोसावी २३ दिसम्बर, २०१९

रूहानी जिस्म

रूहानी जिस्म गुजारा हो ही जायेगा तेरे बगैर मेरे दोस्त! जरूरते हमारी रूहानी थी और तेरी जिस्मानी! रूह कहीं से कोई तो धुंड ही लेगा, ना मिलेगी तो भी गुजारा कर ही लेगा। जिस्म तो तुम्हें हजारों मिलेंगे, न चाहो तो भी आ आ कर लिपटेंगे! कभी जो याद आयी तो खयालो में मिल लेना। जिस्म भी हमारा तुम्हें वहीं तड़पकर मिल ही लेगा! गर जरूरत लगे हमारी तो चले आना एकबार जिस्म उतारकर! मिल ही जायेंगे हम तुम्हें कही भी अपनी जान लुटाकर! -योगेश गोसावी २३ दिसम्बर, २०१९

वेहम

वेहम ढलती हुई ख़ामोशसी ये रात, थोडी और बदसूरत होगयी। जब मेरा आज का हौसला, कल की उम्मीदें साथ ले डूबने लगी। कौन जाने कल सूरज कौनसी मासुमसी रोशनी लायेगा? दिन के उजाले में चांदनी लायेगा या अपनी गर्म सांसो से हमे जलायेगा? ना जाने कहाँ से आती है ईतनी हिम्मत उलझनों में, की उलझा बैठती है बरसों से सुलझे हुए जमाने को। ये जमाना तो क्या कहीये, कहाँ सुनता है किसी की बात। बस होड में लगा रहता है लगाने तुमपे कोई दाग। दाग भी लगा दिया, तो भी ये कहाँ रुकेंगे मेरे यारा। कुछ न कुछ करके छिन लेंगे ये रिश्ता हमसे प्यारा। रास नहीं आयेगा हमारा यूँ आझाद जीवन सारा। करके कोई बात बिगाड़ेंगे फिर आशियाना हमारा! रेहना ये यहां तो सुन ले मेरी बात प्यारसे, छोड़ सारी उलझने और उड़ान भर दिलसे। रात की खामोशी भी फिर कोई गीत गुनगुनायेगी, सूर्य भी चांदनी देगा और चांदनी भी आग लगायेगी। मन ही का ये वेहम, ये कोई पाप पुण्य नही, हम सब ही है रिश्तेदार कोई जात पात नही। -योगेश गोसावी २३ दिसेम्बर, २०१९

सुलझी उलझने

सुलझी उलझने बेवफा तो तू नहीं, पर वफा भी कहा कर रहा? हजारो उलझने युं दिल में लेके चल रहा! काफ़िला छूट जाये ईससे पेहले संभल तो जा जरा, कुछ देर एक जगह बैठ अपनी उलझने तो सुलझा जरा! उलझनेही है ये, सुलझ तो जायेंगीही। कहा ये तुम्हांरे साथ आगेतक बढ पायेंगी। हौसला तो कर उनसे सामना करनेका, एक बार पलटकर तो देख काफ़िला अपनोंका। आदमीही है तू, भगवान तो नहीं। गिर कर उठना, उलझ कर सुलझना कुछ बुरा तो नहीं। हौसला बुलंद रखं अपनी चाहतोंका, एक दिन तू पा ही लेगा जहा मुक्कमल आसमानोंका। -योगेश गोसावी २० डिसेंबर, २०१९

द्वंद्व

द्वंद्व विचारांचं द्वंद्व जेंव्हा प्रत्यक्षात अवतरतं, सार अवकाश मग क्षणभर बघ थांबत! हातात आली संधी मग संधी उरत नाही, माझ्या वरची तुझी जबाबदारी पाठ सोडत नाही! मिळालेलं स्वातंत्र्य आणि प्रेम जाणीव करून देतात, मी ही आहे पुरुषोत्तम हे त्यामुळेच अनुभवू देतात! उचलेल पाऊल मग कसं योग्य ठिकाणीच पडत, मनात उठलेल काहूर अस आपोआप निवळत! -योगेश गोसावी १५ डिसेंबर, २०१९

अवघड वाटा

अवघड वाटा मृत्यू पण आता मित्रा सारखा वागतो, जरा आठवण काढली की पुढे उभा राहतो! प्रेमापेक्षा आजकाल मरण झालयं सोपे, प्रेमाला तरी आता कोणते गाव राहिलंय कोठे? प्रत्येक जण याच्यापासून लांब पळू पाहतोय, सरते शेवटी उपाय म्हणून यालाच मिठीत घेतोय! एकदा तरी थोडा विचार करून पाहा, मरायचं आहे एकदाच, रोज थोडं जगून तरी बघा! मरण आणि मारण्याच्या आहेत सोप्या वाटा, एकदा तरी अंगावर घ्या अवघड प्रेमाच्या लाटा! -योगेश गोसावी १० डिसेंबर, २०१९

मोहिका

मोहिका कानात सनई वाजू लागली, हृदयाची धडधड वाढू लागली! गोड अनामिक चाहुलीने गालावर लाली पसरू लागली! हळदीचा तोरा मिरवून झाला, मेंदीचा रंग रंगात आला! जवळ येणाऱ्या पावलांचा आवाज अजून गडद होऊ लागला! पण आत अजून कोठेतरी काय हे टोचतंय? कोणीतरी मला आत अजून का ओढतंय? माझंच आहे हे घर, मग आता परकं का भासतंय? सगळ्या स्वकीयांच्या गराड्यात एकटं का वाटतंय? हेच असतं का लग्न, सगळं सोडून निघणं? नव्याने आपलं जग दुसऱ्या सोबत वसवणं? सगळ्यांची काळजी घेणारी मी, माझी काळजी कोण घेईल? की तुम्हां सर्वांचे शुभाशीर्वाद मला किनारा दावतील? नकोत आता कुठल्या व्यर्थ ह्या चिंता, टाकता पाऊल एक एक सुटेल सगळा गुंता! दोघे मिळून चढवू संसाराची विट एक एक नवी, तुमची पावलं वाढवतील त्यात सुखं हवी हवी! -योगेश गोसावी २ डिसेंबर, २०१९

स्नेहल

स्नेहल नाव तिचे स्नेहल पण स्नेह फार कमी, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी! गप्पा मारा काहीही कितीही, थकणार नाही कधी! जाल थोडे पुढे तर कानफाडायला करणार नाही कमी! जा तुम्हीं जिंकायला, करा प्रयत्नांची काष्ठा, येईल तुमच्या लक्षात, अजिंक्य तिचा बाणा! एखादी तरी अशी, मैत्रीण भेटावी गुणी, होतील काही क्षण तुमचे निरंतर सुखी! -योगेश गोसावी २९ नोव्हेंबर, २०१९

रंग मावळतीचे

रंग मावळतीचे मावळतीला रंग उधळतो मित्र नव्हे हा सखा, निशा आणते मग आपला काळा शालू नवा! आपसूक समेटून घेई ती हा रंगदार विखुरलेला पन्हा, जेणेकरून नव सलाम द्यावा आपण दिवसाला पुन्हा! निसर्ग सांगतो नित्यचक्र हे असेच चालू ठेवा, कधी हर्ष तर कधी दुरावा हवाच रे आपल्या मना! रंग मनाचे विखरुद्या तुम्हीं या क्षितिजावर, पुन्हां निशेची चादर घ्या अन पसरा मग त्यावर! खेळ हा नित्य खेळती जे प्राणी मनभर, जगणे त्यांचे होईल गाणे सांगे तो ईश्वर! -योगेश गोसावी २८ नोव्हेंबर, २०१९

कुछ तेरी तरह, कुछ मेरी तरह।

कुछ तेरी तरह, कुछ मेरी तरह दूर गगन में अकेला रेहता है वो, कुछ तेरी तरह, कुछ मेरी तरह। नजर सबको आता है, फिर भी है तनहा, कुछ तेरी तरह, कुछ मेरी तरह। क्यूँ ना उसे कोई चांदनी दिला दे, कुछ रातों के लिये। पलभर खुश होके जिंदा रेह लेगा, कुछ तेरी तरह कुछ मेरी तरह।  चल कुछ कदम उठाले आसमां की तरफ, उतार लाते है उसे जमी पर। खुश हो जायेगा अपनों को पाकर, कुछ तेरी तरह कुछ मेरी तरह। -योगेश गोसावी १७ नोव्हेंबर, २०१९

मंजिल की ओर

मंजिल की ओर चल पडे हो तुम अपनी मंजिल की ओर, कुछ तोहफा दे नहीं पायेंगे। है जो थोडी बहुत यादें अपनी ऊन्हेंही समेटते रहेंगे। गर किसीं बात का है गिला शिकवा तो उसे छोड जाना तुम, बस मिले थे कुछ कदम, कुछ देर, उन्हें याद रखना तुम। गिर ना जाये हम कही, उसका ही वो अंदाज था, थाम लिया था हमने हात, बस वही पल एक सपना था। गुजारी थी जो राते साथ, उसकी चांदणी याद आयेगी, आनेवाले कुछ काली रातोंको और थोडा मेहकायेगी। दोस्त है, दोस्त ही रहेंगे, कुछ और न सोचना तुम, चलते गर थक जाओ बस याद हमे करना तुम। मैं नहीं पुरा घर है ये तुम्हारा, हमसफर मेरा भी तो दोस्त है तुम्हारा। गर लगे थोडा रुकना जरुरी है, तो चले आना दोबारा। खोल कर बैठेंगे फिर वही, पुराणी यादोंका पिटारा। -योगेश गोसावी २ नोव्हेंबर, २०१९

ऐकशील ना?

ऐकशील ना? अतिपरिचयात अवज्ञा तुला रे का कळतं नाही? आलास मनाप्रमाणे पण निघायचं का वळत नाही? नेहमीचं झालयं तुझं आता हे लहरी वागणं, हवं तेंव्हा न येणं आणि नको तेंव्हा जाणं! घरचे आताशा मला तुझ्यासोबत जाऊ देत नाही, करशील तांडव कधी याचा आता भरोसा नाही! लागलंय का काही तुला कोठे खोलवर आत? की नुसताच आळवतोय पुन्हां जुना पहाडी राग? तिला पण आताशा तू नकोसा झालायं, तुझ्या ह्या पाघळेपणाचा तिला संताप आलाय! तुला म्हणून सांगतो ऐक माझं लेका, हाताला कोणी धरण्या आधी आपण पकडव्यात वाटा! प्रिय पावसा, ऐकशील ना रे या आमच्या हाका!! -योगेश गोसावी १ नोव्हेंबर, २०१९

ती रात

ती रात ती रात मंतरलेली, काळोखाने पेटलेली, सांगून गेली अर्थ नवे, हवेसे अन नकोसेही! ती रात गंधाळलेली, रातराणीने माखलेली,, पुन्हां पुन्हां बजावूनही काहीशी विस्कटलेली! ती रात तुफानलेली, समींदरावर आलेली, ढकलून गर्तेत आपल्याला किनाऱ्यावर आणणारी! ती रात उजळलेली, मनातल्या विचारांनी, मृत्यूलाही पुन्हां हरवून उगवतीकडे निघालेली! ती रात तुझी माझी, आयुष्यातली शेवटची, सगळं काही देऊनही पुन्हां हिरावून घेणारी! ती रात आसुसलेली, उगवतीला येण्यासाठी एका नव्या सुरुवातीला पुन्हां उजाळा देण्यासाठी! -योगेश गोसावी ३१ ऑक्टोबर, २०१९

मैत्र

मैत्र सर्वांच्या वाटा वेगळ्या पण दिशा मात्र एक आहे, हातात जरी नसला हात तरी एकमेकां साथ आहे. या सर्वांचे मार्ग कधी एकमेकां छेदनार नाहीत, सरळ यांचे चालणे कधी वाकडी वाट होणार नाही! सगळे आपल्या वाटेवर मार्ग क्रमित राहणार, सुख दुःख एकमेकांचे नेहमी ऐकमेकां ऐकवणार! तुम्हीं सांगा या नात्याला नाव काय द्यावे? वेगवेगळे सगळे जीव वेगवेगळेचं राहावेत! बंध हा नात्यांचा मैत्री त्याचे नाव, सापडलाय का तुम्हां कोणाला कधी यांचा गाव? -योगेश गोसावी २९ ऑक्टोबर, २०१९

ईच्छा

नुकतंच जन्मलेलं पिल्लू आता घरट्याबाहेर पाहू लागलं, उंच उडणाऱ्या पालकांना बघून उडण्याची आस बाळगू लागलं! आस मनाची ईतकी की घरट्यातच पंख फडफडू लागले, अवस्था त्याची बघून आई बापही घाबरू लागले! कधी कोण जाणे काय होईल घात शंका ही आली, बाळाच्या आकांक्षाना थोपवण्यात शक्ती खर्च झाली! काय करावं त्यांना काही सुचेना, नको त्या वयात काय करेल बाळ काही त्यांना कळेना! धीर करून शेवटी बाबा पुढे झाला, घेऊन त्याला सोबत बाहेर उभा राहिला! सोबत त्याला घेऊन धडा सुरू झाला, पंखां आधी तो त्याचे मन तयार करू लागला! बाळाला ही कळले नुसते पंख असून चालणार नाही, उडण्याची हौस नुसती ईच्छा असून भागणार नाही! काही गोष्टी या योग्यवेळीच होणार, तेंव्हाच तर त्यांचे मोल आयुष्यभर टिकणार! परतले घरट्यात ते गोजिरे घेऊन हा धडा, आई सांगते योग्य वेळीच होतील योग्य गोष्टी बाळा! -योगेश गोसावी २९ऑक्टोबर, २०१९

दिवाळी शुभेच्छा!

शुभेच्छा दिवाळीच्या! दिवाळी असो की एखादा दुसरा महत्वाचा सण, पुण्याच्या गजबजाटाला फाटा देऊन नेहमीच आम्हीं गाव गाठतो! या सणांची मजा गावकडेच जास्त येते! कारण काहीही असोत पण ती मजा पुण्यात येत नाही! यावेळीही गावाकडेच आलो आहे! नेहमी प्रमाणे गाडी काढली आणि बाहेर निघालो! खरतरं वाढणाऱ्या गाडीच्या वेगाबरोबर मन पुढं पुढं जायला हवं होतं पण ते मात्र भरभर भूतकाळात निघालं! रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणावरच्या खुणा, काही ओळखीची घरं (ज्यांच्याशी ओळख करायला त्या काळात हिंम्मत झाली नव्हती!😂) काही कट्टे, अशा सगळ्या गोष्टीं मला भूतकाळात घेऊन जात होत्या! वर्षभर हरवलेल्या या वाटा आणि खुणा नेहमी अशा सणांच्या दिवशीच भेटतात आणि त्रासयुक्त आनंद देतात! आज म्हटलं मस्त देवीचं दर्शन घ्यावे, लक्ष्मीपूजन आहे तर हा मुहूर्त साधावा! निघालो आणि काही क्षणात ११वी १२वीचं ज्युनिअर कॉलेज दिसलं.... ती खिडकी, ज्यातून डोकावून पाहत बाहेरच्या जगाचे आडाखे बांधत शिक्षण सुरू होत आणि त्या खिडकीच्या कडेचा माझा बाक जणू काही तोही माझाच भाग होता! त्याच्या सोबत राहूनच कित्येकदा कटाक्ष टाकले पण आणि कित्येक पकडले पण! 😜 खूप सारे मित्र आणि...

पतंग

पतंग पतंगा तू असा कितीसा रे उंच उडणार? दोर तुझी माझ्या हाती तुला रे मीचं सावरणार! आलीच कधी अवखळ हवा तर फिर मनासारखा, जायला लागला तुझा तोल तर मी आहे येथे उभा! उंच गगणाच्या भिंती घालतील तुला साद, नेहमी लक्षात राहू दे करतील त्याच तुझा घात! तुला वाटणारा बंध हा तुझंच वरदान आहे, उडत तुला ठेवून सुख देणं हेच त्याच काम आहे! वाटलं जर कधी तर एकदा इकडे खाली पहा, बंध तुटलेला तुझा सखा ईथे पायाशी आलेला पहा! -गोसाव्यांचा योगेश २५ ऑक्टोबर, २०१९

शुभेच्छा

नकोत रुसवे फुगवे, नको तो अबोला! समजून घ्या एकमेका,अवघड पुढल्या वाटा! रागावला एक तर दुसरा राहु द्यात शांत, प्रवास होईल तुमचा मग हा निवांत! प्रेमापाई आला आहात एका वाटेला, कधी व...

आभाळ आणि तू

आभाळ भरून येताना आणि तू जवळ नसताना, काहूरत माझं मन नेहमीच कातरवेळ सरताना. नसताना तुम्हीं मन विचार तुमचाच करत, कधी येऊन बरसणार हाच ध्यास घेऊन बसत! आल्यावर तुम्हीं मात्र मा...

पझेसिव्ह

पझेसिव्ह हे आजचं नाही वर्षानुवर्षाचं आहे, पझेसिव्हनेस वरून भांडण आमचा छंद आहे! पुरुषी भावनांचा खेळ तिला म्हणे माहीत आहे, घरातला हा पुरुष मात्र बाहेरच जग ओळखून आहे! मी मात्र स्वतःला कलियुगातील राम समजतो, पर नारीशी वागताना मोकळेपणाने वागतो! तिलाही माहिती आहेत स्त्री हृदयाचे खेळ, म्हणून तात्पुरता सटकतो मग आमचा हा मेळ! हे ही माहीत आहे दोघेच आहोत एकमेकांना, तरीही ही फोडणी पुरते १-२ दिवसाच्या अबोल्याला! हा पझेसिव्हनेस म्हणजे आहे तरी काय? गूढ या प्रश्नाचं उत्तर आम्हां कधी मिळेल काय? मला तर वाटतो हा विश्वास परक्या धुर्ततेचा, तुम्हांला वाटू शकेल एकमेकांच्या अविश्वासाचा! उत्तर ज्याने त्याने आपापलं सभोवताली शोधावं, नाहीच सापडलं तर प्रेमाचं इंजेक्शन अजून जोरात टोचाव! -योगेश गोसावी ४ जून, २०१९

शब्द

शब्दच सखे, शत्रूसुद्धा शब्दच. शब्दच सोबती, एकांती शब्दच. हत्यारही शब्द, बेजारही शब्द. मैत्रातही शब्द, बाजारही शब्द. धिक्कार, फुत्कार, हुंकारही शब्द. सर्वोपरी, सर्वव्यापी ऊ...

निघालीच आहेस तर

निघालीच आहेस तर निघालीच आहेस तर मागे तरी नको वळून पाहुस, न होणाऱ्या गोष्टींची जाताना चाहूल नको देऊन जाऊस! उनाड माझं मन उगाच भरकटत जात, हसण्या वागण्या बघण्याच्या तुझ्या सवयींना प्रेम समजू पाहत! चाललीसच तर थोडं थांबून पहा, खरचं जायचं ना एकदा विचार करून पहा! नाही आलीस माझ्या सोबत तरी चालेल मला,पण निदान तू स्वतः सोबत तरी राहा! निरोप द्यायला आलो होतो, तो मी सल्ला देऊन जातोय! डोळ्यातलं तुझं वादळ शांत करू पाहतोय! काही लढाया जिंकण्यासाठी काही लढाया हराव्या लागतात! आयुष्याचा सोबती शोधायला माझ्या सारखेच कामी येतात! -योगेश गोसावी ३ जून, २०१९

लोक काय म्हणतील??

लोक काय म्हणतील हाच विचार येतो, नाहीतर मी सुद्धा हिमालय रोज पालथा घालतो! येता जाता मी सुद्धा अनेक गड जिंकतो, विचार यांचा मनात आला की तलवार म्यान करतो! आईला वंदन करताना असतो ...

स्वभाव

स्वभाव स्वभाव म्हणजे आहे तरी काय? स्वतःला भावणारे वागणे तर नव्हे ना? माहीत नाही आणि माहिती होऊनही काही उपयोग नाही! पूर्वज सांगतच आलेत की त्याला काही औषधच नाही! मग आता यावर ...

प्रेम

खरं सांगू का.....परत परत प्रेमात पडावं ही एकच भावना ईतकी सुखावणारी आहे की बस!! पुढे काय होणार याचा विचार न करता त्या क्षणी असं उत्कट होऊन त्या त्या वेळी प्रेमात पडत राहिलं ना की ...

प्रश्न

का सारखे हे मला असे स्वप्न यावे? निघोनी घरातुनि मी तुजकडे यावे! निशिगंधाचा धुंद गंध काय मला सांगतसे? रात्रीचा हा आभास कोठे मला नेत असे? पायाची गती आता काहीशी मंदावली, चांदण...

सोबती

सोबती जन्म माझा झाला अन तुही मज सोबत अवतरला! नकोसा असतानाही नेहमीच पाठी आहे राहिला! तुझे माझे सौख्य पहिल्या श्वासा सोबतचे, नकोसे असतानाही माझ्यावर लादलेले! जेथे जातो मी, तेथे तूही सोबत येतो, जीवघेणा पाठशिवणीचा खेळ नित्य खेळतो! हरतो तू नेहमी, अन नेहमी मी सुखावतो, तू जिंकण्याच्या भीतीने मात्र नित्य मी दुखावतो! तूच सत्य! तूच अंत! तरीही तुज मी नाकारतो! डिवचा कितीही तुला, निर्लज्ज तरी पाठी उभा राहतो! जिंकेल तो दिवस तुझा असेल, हे ही ठावे मला, पण हरायला ही नसेन मी हीच आहे वेदना! हे मृत्यो! असलास जरी सखा तू, जिंकू नकोस बेसावध! ये तू हसत वाजत गाजत, अन कर माझी पारध!! -गोसाव्यांचा योगेश ९ जानेवारी, २०१९