ती रात
सांगून गेली अर्थ नवे, हवेसे अन नकोसेही!
ती रात गंधाळलेली, रातराणीने माखलेली,,
पुन्हां पुन्हां बजावूनही काहीशी विस्कटलेली!
ती रात तुफानलेली, समींदरावर आलेली,
ढकलून गर्तेत आपल्याला किनाऱ्यावर आणणारी!
ती रात उजळलेली, मनातल्या विचारांनी,
मृत्यूलाही पुन्हां हरवून उगवतीकडे निघालेली!
ती रात तुझी माझी, आयुष्यातली शेवटची,
सगळं काही देऊनही पुन्हां हिरावून घेणारी!
ती रात आसुसलेली, उगवतीला येण्यासाठी
एका नव्या सुरुवातीला पुन्हां उजाळा देण्यासाठी!
-योगेश गोसावी
३१ ऑक्टोबर, २०१९
Comments
Post a Comment