पतंग
दोर तुझी माझ्या हाती तुला रे मीचं सावरणार!
आलीच कधी अवखळ हवा तर फिर मनासारखा,
जायला लागला तुझा तोल तर मी आहे येथे उभा!
उंच गगणाच्या भिंती घालतील तुला साद,
नेहमी लक्षात राहू दे करतील त्याच तुझा घात!
तुला वाटणारा बंध हा तुझंच वरदान आहे,
उडत तुला ठेवून सुख देणं हेच त्याच काम आहे!
वाटलं जर कधी तर एकदा इकडे खाली पहा,
बंध तुटलेला तुझा सखा ईथे पायाशी आलेला पहा!
-गोसाव्यांचा योगेश
२५ ऑक्टोबर, २०१९
Comments
Post a Comment