रात्र ही अशी सांगून का येते? अंधाराला का अशी दया कधी येते? आम्हीच का मग असे मागे येतो? प्रत्येक लढाई न लढताच हरतो!! आता ना कधी असे पुन्हा होणे, पाऊल आता पुन्हा न मागे हटने!! सह्य कड्याचे आम्ही मावळे, अंधाराला आता ना भीक घालणे!! पंख पसरुनि उडणे आम्हास ना ठावे, पाय आमचे घट्ट जमीवर, हरणे आता आम्हास ना भावे!! --योगेश गोसावी २४ जानेवारी २०१३