Skip to main content

Posts

रंग तिचा

रंग तिचा रंग आणि ती, सबंध थोडा वेगळा आहे, जवळून एक रंगी वाटणारी ती, इंद्रधनुच अंग आहे! रंगांची पंचमी आज, महिला दिनाला भेटली आहे, खरा लौकिक तिच्या दिवसाला आज मिळाला आहे. आपल्याला आपल्या सारखी भासणारी ती, इतरांना पण त्यांच्या सारखीच भासते खरी! वेगवेगळ्या नात्यांना निभावणारी ती, इंद्रधनुचा पिटारा घेऊन असते कायम उभी! जमेल जेंव्हा तुम्हांला तिच्या रंगांना साथ देणे, पंचमीच्या रंगांचे रोज लेऊ शकाल लेणे! -गोसाव्यांचा, रंगमय योगेश! ८ मार्च, २०२६
Recent posts

बंद दरवाजे, खुली खिड़कियां

बंद दरवाजे, खुली खिड़कियां दरवाजा जो बंद हुआ, वो तेरे कारण तो नहीं। खिड़की भी खुली है, तेरे रुकने से तो नहीं। आकाश को जो देखोगे, उड़ान ही की सोचोगे। दरवाजे के पीछे, क्यों ढूंढते हो अपनी नाकामयाबी? रुकना तो तेरी फितरत में कभी था ही नहीं। फिर आज ही क्यों रुके है तेरे पैर एक दरवाजे पे यूंही? बंद दरवाजे को यूं कब तक देखोगे योगी? खुली खिड़कियां भी दिखाती है आकाश के रंग सभी। ©गोसाव्यांचा योगेश १६ मार्च, २०२५

मैं, कुछ अलग सा!

मैं, कुछ अलग सा! हुआ था प्यार मुझे, और तुम्हें भी। सही था, गलत था, इस विचार से कोसों दूर। बहना उसके कारण, गवारा न था मुझे, और तुम्हें भी। हसीन मोड था, हकीकत की दुनिया से कोसों दूर ही। लड़खड़ाए नहीं पांव मेरे, और तेरे भी। प्यारा सफर था, जितना ही था, भाग दौड़ से थोड़ा दूर ही। रास्ते अलग है अपने, जानता था मैं, और तू भी। आज भी इसलिए है चेहरों पे मुस्कान मेरे, और तेरे भी। रोजमर्रा की जिंदगी में आएं कभी आसूं मेरे, और तेरे भी। कर लेना याद तेरा मुझे सताना, और मेरा तुझे रुलाना भी। हकीकत हूं और थोड़ा अफसानासा, दोस्त है ये तेरा, जो कहता हैं, हां हूं मैं थोड़ा अलगसा। -गोसाव्यांच्या योगेश ५ फेब्रुवारी, २०२५

मतदार राजा?

मतदार राजा (?) ताई माई दादा आप्पा आबा तात्या म्हणत फिरत होता! दिसायला साधाच, पण भविष्य आमचं त्याच्या हातात मागत होता! दिसायचा अधे मधे कडक कपड्यात फिरताना, आताशा रोज येतोय, दुसऱ्याच्या गाडीवर बसून हाल आमचे विचारायला! नाव घेतोय सगळ्यांची, हात धरतोय प्रत्येकाचा दोन घास खाऊन पोट भरलं म्हणतोय प्रत्येकाला! सोपा आहे डाव त्याचा, खेळ खेळतोय भावनांचा ठाव घेऊन मनाचा, धंदा करणार पुढच्या पाच वर्षांचा! मतदार राजा, बाजूला टाकून शाळेत नागरिक शास्त्राला, घोटला आहेस तू गळा स्वतःच्या भविष्याचा! कळतंय का तुला, काय मागतो आहे तुझा नेता? मत देऊन हुशारीने, होणार का रे तू खराखुरा राजा? -गोसाव्यांचा योगेश २१ ऑक्टोबर, २०२४

कळप लाचारांचा

कळप लाचारांचा लाचारांचा कळप इकडून तिकडे फिरत होता, हिरवा चारा जास्त दिसेल तिकडे लगेच वळत होता! कुटुंब, नाती-गोती, परिचित, अपरिचित, सगळे बांधून दावणीला चाऱ्यासाठी वणवण करत अहोरात्र फिरून पण थकत नव्हता! चूक त्याची नव्हतीच मुळी, चूक होती तुमची आमची, शिवार सगळा मोकळा करून गाव आपण विकला होता! तो आपले कुरण पाच वर्षांसाठी राखत होता! मालक आपण त्यांचे रहाटगाडग्यात गुंतून त्याचा डाव डोळे झाकून पाहत होता! -गोसाव्यांचा योगेश २१ ऑक्टोबर, २०२४

वेड

वेड वेड्या मनाची वेडी स्वप्ने शहाण्यांच्या जगात घेऊन फिरताना उगाच वेडावल्या सारखे वाटते. शहाणे कावळे वेडावलेली फुलपाखरे हाकलू पाहतात. आणि तेथूनच धुमारे फुटणाऱ्या मनाला वास्तविकतेच्या झळा होरपळू लागतात. वेड मन पुन्हा शोधू पाहत अजून एक वेड मन. सापडलं कधी चुकून तर पुन्हा चक्र सुरू राहत. वेड्यांचा दुनियेत उनाड बागडणाऱ्या मनाला, शहाण्यांच्या दुनियेत होरपळत राहावं लागतं! ©गोसाव्यांचा, वेडा योगेश १ ऑगस्ट, २०२४

दास

दास वो कहते रहे धर्म उनका खतरे में है, कुछ तो करो। हम बताते रहे हम हिंदू है, तुम बस प्यार से रहो। अहिंसा के पुजारी, सब को है माननेवाले। है क्षत्रियों के वंशज, नारी है हमारी पालनहारी। पर शायद उनको राजनीति ही है करनी। धर्म को दांव पर लगाकर, सत्ता है हथियानी। तुम अपना आपा ना खोना, धर्म आचरण यूं न छोड़ना। सब होगा ठीक तेरे साथ, बस बना रहे शिव का दास। -गोसाव्यांचा योगेश १० फरवरी, २०२४