कळप लाचारांचा
लाचारांचा कळप इकडून तिकडे फिरत होता,
हिरवा चारा जास्त दिसेल तिकडे लगेच वळत होता!
कुटुंब, नाती-गोती, परिचित, अपरिचित, सगळे बांधून दावणीला
चाऱ्यासाठी वणवण करत अहोरात्र फिरून पण थकत नव्हता!
चूक त्याची नव्हतीच मुळी, चूक होती तुमची आमची,
शिवार सगळा मोकळा करून गाव आपण विकला होता!
तो आपले कुरण पाच वर्षांसाठी राखत होता!
मालक आपण त्यांचे रहाटगाडग्यात गुंतून त्याचा डाव डोळे झाकून पाहत होता!
-गोसाव्यांचा योगेश
२१ ऑक्टोबर, २०२४
Comments
Post a Comment