Skip to main content

Posts

Showing posts from 2023

मराठी ओळी

ही वाट उगाचच भरकटलेली, पायात घुटमळताना ह्रदयात शिरलेली. ही वाट अशी चुकलेली, नात्यांना अर्थ सांगणारी! -गोसाव्यांचा योगेश २ सप्टेंबर, २०११ चांद आज हा मातला असे या नभात, चांदण्यांचा सडा मग पडे आज अंगणात. काजळीने फेसाळलेला अंधार या नभात, रात्रीचा हा खेळ बघू, चल बसू अंगणात! -योगेश गोसावी १३ डिसेंबर, २०१६ आठवणींचा झोका नेहमीच असं करतो, जवळ आलाय असं वाटत असतानाच मागे फिरतो. -योगेश गोसावी १५ डिसेंबर, २०१६ मावळतीला बघा मित्र हा कसा असे चालला! भेटून येतो मी निशेला गुज सांगून मला चालला! -योगेश गोसावी ३ जानेवारी, २०१९ दररोज येणारा तो आज काहीसा मिश्किल वाटला! धुक्याची तिची चादर लपेटून उगाच थोडा हळवा भासला! -योगेश गोसावी ९ जानेवारी, २०२० देव आणि दानव वेगळे आहेत थोडेच, भांडत ठेवून आपल्याला करतात मंथन सारेच! -योगेश गोसावी १० फेब्रुवारी, २०२० ग्रीष्माचा तडाखा सहनच करावा लागतो, लागलीच सावली तर मग कोणाचा तरी आसराच घ्यावा लागतो! म्हणूनच मी नेहमी झाड होऊ पाहतो, तडाखा सोसून का होईना थोडा थंडावा देऊ पाहतो! -योगेश गोसावी २३ एप्रिल, २०२० झाड गुलमोहोराचं, ग्रीष्मात पण बहरलेलं. मन माझं आसुसलेलं, वळवाच्या आठवणीनं...