आस तुझी जुन्या आणि सुन्या या माझ्या मैफिलीत, विषय ही फक्त तुझेच असतात! सरल्या दिवसाच्यां आठवात, आजचे सगळे दिवस ही रिते होतात! उगाच अजूनही आहे ओढ तुझ्या येण्याची, अजूनही आहे आस तुझी, माझ्यात फुलण्याची! का कोण जाणे अजूनही वारा तसाच वाहतो, तू येण्याआधीचा मोगऱ्याचा गंध अजूनही मंद दरवळतो! आताशा मात्र ओढ तुझी पुसट होत चालली आहे, क्षितिजावरती शुक्राची चांदणी नवी दिसली आहे! चांदवा पण हळू हळू घेईल आता माझा ताबा, स्वप्नांच्या गावात मग बसेल परत नवा ताफा! कधी तरी हा स्वप्नांचा गाव येईल का प्रत्यक्ष? होईल का मग आपल्या दोघांचा एकरूप हा अक्ष? का कोण जाणे आस ही सुटत नाही, तुझी माझ्यात असणारी ग्वाही पाठ काही सोडत नाही! -योगेश गोसावी १८ मे २०१८