रात्र हळूहळू पुढे सरकताना ओघळणाऱ्या मिट्ट काळोखात, हिमालयाच्या सानिध्यात, दर्या सिंधच्या येणाऱ्या आवाजात, हात पसरवून उभा असलेला मी!
आकाशातून बरसणाऱ्या चांदण्यांचा सडा अंगावर झेलत होतो! आणि क्षणार्धात वीज चमकावी तसा एक विचार चमकून गेला!
कोण आहे मी? या सगळ्यांला पाहून खेळणारा जीव की यांचं अस्तित्व मान्य करण्यासाठी त्याने*निर्मिलेला एक जीव?
असेना का मी कोणीही! पण नक्कीच आहे मात्र रसिक! असाच प्रवास चालू ठेवेन, जो कोणी निर्माता आहे त्याची जी किमया बघेन आणि त्यातच सामावून जाईल, पण मन भरल्यावरच!!
-योगेश गोसावी
११ मे २०१८
Comments
Post a Comment