Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

भांबावलेला मी!

भांबावलेला मी! स्वप्न पाहावीत की बोलावीत, काही कळेनासं झालयं! वर्तमान जगावा की भविष्य पाहावं, काही उमगेनास झालयं! आकांक्षांना माझ्या पंख फुटताहेत, की कोणा अपरिचिताचे हे संकल्प आहेत काही कळेनासं झालयं! दिन रात एकसमान वाटणारे हे विचार का थांबत नाहीत काही उमगेनास झालयं! जावे का ही अधिरता घेऊन त्या निसर्गात जो माझ्यातही आहे? की फुलवावा तोच अवतीभवती काही कळेनासं झालयं! द्विधा ही माझी, अधिरताही माझीच आणि तरीही भांबावलेला मीचं! दिशाहीन वाटतानाही प्रत्येक दिशा माझीच का वाटतेय कळेनासं झालयं! उमगत असेल तुला तर सांगशील थोडं मला ही! सगळं काही माझंच असून, अजून काहीतरी हवं का वाटतयं! ग्रीष्माच्या या तडाख्यातही थंड का वाटतंय, असं सगळं असूनही आत का आणि काय जळतयं? काहीच का कळेना आणि काहीच का उमगेना? हे दोन्हीं प्रश्न का छळताहेत मला काही समजेना! -योगेश गोसावी २५ मे, २०२०

फरिश्ता

फरिश्ता कुछ तो बात होगी, जो थम गये थे पलभर ये पाँव। दिल में शायद कोई तो कसक होगी, ना धूप देखी ना छांव। चलना ही जिंदगी है, तो ये थमना किस लिये? जाना ही है एकदिन, तो दिल का लगाना किस लिये? मुसाफिर हूँ, पड़ाव पे रुकना ही होगा। दो बातें सही, दिल का हाल बताना तो होगा। पड़ाव हो तो हम जैसे आयेंगे ही, पल दो पल दिल खोल के बैठेंगेही। गर नहीं चाहते तुम यूँ पलभर का रिश्ता, तो उठ औऱ चल मेरे साथ, बना दूँ तुझे फरिश्ता। -योगेश गोसावी ५ मई, २०२०

गप्पा

गप्पा कित्येकदा असं होतं, खूप बोलायचं असतं! पण वेळ नसेल, बिझी असेल, अस समजून टाळायचं असतं! का म्हणून काय विचारता? लगेच नाही येणार प्रतिसाद,  आपण आधीच थोडं आवरायचं असतं! आहेत बाकी अजूनही जवळचे, असेनात का!  असतील आपल्याहून आधीचे तर मग काय? वाट नाही बघवत आम्हांला कधी! गप्पांची सुनामी असतेच आमची अशी! म्हणून तर बरेच विषय न बोलताच संपतात! मनाचा एक कोपरा नेहमीच भरून ठेवतात! -योगेश गोसावी १ मे, २०२०