गप्पा
कित्येकदा असं होतं,
खूप बोलायचं असतं!
पण वेळ नसेल, बिझी असेल,
अस समजून टाळायचं असतं!
का म्हणून काय विचारता?
लगेच नाही येणार प्रतिसाद,
आपण आधीच थोडं आवरायचं असतं!
आहेत बाकी अजूनही जवळचे, असेनात का!
असतील आपल्याहून आधीचे तर मग काय?
वाट नाही बघवत आम्हांला कधी!
गप्पांची सुनामी असतेच आमची अशी!
म्हणून तर बरेच विषय न बोलताच संपतात!
मनाचा एक कोपरा नेहमीच भरून ठेवतात!
-योगेश गोसावी
१ मे, २०२०
Comments
Post a Comment