Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

रंग तिचा

रंग तिचा रंग आणि ती, सबंध थोडा वेगळा आहे, जवळून एक रंगी वाटणारी ती, इंद्रधनुच अंग आहे! रंगांची पंचमी आज, महिला दिनाला भेटली आहे, खरा लौकिक तिच्या दिवसाला आज मिळाला आहे. आपल्याला आपल्या सारखी भासणारी ती, इतरांना पण त्यांच्या सारखीच भासते खरी! वेगवेगळ्या नात्यांना निभावणारी ती, इंद्रधनुचा पिटारा घेऊन असते कायम उभी! जमेल जेंव्हा तुम्हांला तिच्या रंगांना साथ देणे, पंचमीच्या रंगांचे रोज लेऊ शकाल लेणे! -गोसाव्यांचा, रंगमय योगेश! ८ मार्च, २०२६