द्विधा हो म्हणायचे असताना, नाही म्हणून गेलो, पावसात उभा असताना, कोरडा घरी आलो! अस का होत, कधी होत, काही उमजत नाही, मना मधील स्वप्नांना कधीच दिवस मिळत नाही! माझे काही मला कधी जपता आले नाही, एकदा बघितलेले चेहरे, परतून पुन्हा आलेच नाहीत! गर्दी मधून जाताना हल्ली बघत राहतो, आठवनिच्या राज्यातील प्यादे पुन्हा शोधतो! वेड लागाव अस हल्ली कुणीच भेटत नाही, तुम्हा सर्वाना विसराव अस गावच काही येत नाही! -- योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३