पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी
तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी!
घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण?
की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण?
का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावते,
माझ्या या हृदयाला पुन्हा पुन्हा हेलावते!
त्याच्या जाण्याने म्हणे कोणाला काही वाटतं नाही,
उगाच खोळंबून त्याचे राहणे आजकाल लोकांना पटत नाही!
मला मात्र तो आपलासा वाटतो,
भेटायला आलेल्या तुला, जाताना अडवणारा सखा भासतो!
निघालाय आता तो या सगळ्याला कंटाळुनी,
पण देऊन चाललाय वचन येण्याचे परतुनी!
तू ही जा ना अशीच मला चिंब भिजवुनी,
मी ही बघेन वाट तुझी चातक होऊनी!
-योगेश गोसावी
१ ऑक्टोबर २०१८
Comments
Post a Comment