१९९२ व्या वर्षी "दिल हैं छोटासा" म्हणत त्याने आम्हां सर्वाना कधी "ये हसीं वादियां" पाहायला लावल्या कळलंच नाही. या मस्त सुरुवाती नंतर ९३ मध्ये मात्र आम्ही सगळे मोठं मोठयाने ओरडत संगत होता "प्यार कभी ना तोडेंगे". हे सगळं सुरुच होत आणि त्यात भर टाकायला ९४ ला आली "उर्वशी", त्याने नकळतच नाचणाऱ्या आम्हां सर्वाना "सुन री सखी" म्हणत म्हणत हळुवार पण केले, आम्ही मात्र आमच्याच धुंदीत "मुक्काला मुकाबला" करत बाकीच्यांना सांगत होतो "प्रेमिका ने प्यार से". पण त्याने आमच्या इतर काही मित्रांचीही गरज ओळखली आणि घेऊन आला "पट्टी रैप" आणि म्हणायला मात्र लावलं "गोपाला गोपाला". ह्या अचानक इकडून तिकडून उड्या मारायला कसरत होत होती पण मजा हि येत होती. ९५ साली सुरुवात केली "थोडा थोडा प्यार हो गया" म्हणायला पण टीव्ही किंवा रेडिओ साथ द्यायला तयार नव्हता कदाचित .....चुकून कानावर यायचं. घरी टेपरेकॉर्डर नसण्याचा काळ होता तो! त्याच वर्षी आमच्या आवडीच्या सोनालीला घेऊन तिच्यासाठी आम्हाला म्हणायला लावलं "सुन ले ओ जानम...