Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022
काल ज्यू. कॉलेजच्या मित्रांना भेटल्यावर अचानक आठवलं.... गीतामुळे मिळालेली अजून एक मैत्रिण, की मेव्हणी? की बहिण? की वहिनी? सहसा मैत्रीला मी कोणत्या एका नात्यात अडकवत नाही! नाती आली की मानपान येतो.... मैत्रीत मोकळेपणा असतो! सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैत्री गरजे प्रमाणे त्या-त्या नात्यांची जागा पण घेते! ☺️ तर अशी ही आमची २० वर्ष जूनी (?) प्रत्येकवेळी नव्याने निभवणारी आमची मैत्री आता पुढच्या पिढी पर्यंत पोहोचली आहे! अरे हो, आमच्या लग्नात ह्यांच्या कुटुंबातील कोणी नव्हतं म्हणून सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्ण विधिवत लग्न लाऊन देणारी हीच....अर्थातच आम्हाला काहीही माहिती होऊ न देता सगळं यथासांग पार पाडण्यासाठी तिचा अभिषेक, माझा मेव्हणा रणजित, तिची छोटी बहीण दर्शना, तिचे जिजू ओम आणि त्याचे बाबा ही यात होतेच तिला पूर्ण साथ द्यायला!  तर अशीही दिप्ती, गीताची शाळेतली मैत्रिण, आता हक्काने आमच्या पूर्ण कुटुंबाचा भाग झाली आहे! मित्र-मैत्रिणींनी, नात्यांनी श्रीमंत होत असलेला तुमचा मित्र, -गोसाव्यांचा योगेश