Skip to main content
काल ज्यू. कॉलेजच्या मित्रांना भेटल्यावर अचानक आठवलं.... गीतामुळे मिळालेली अजून एक मैत्रिण, की मेव्हणी? की बहिण? की वहिनी?

सहसा मैत्रीला मी कोणत्या एका नात्यात अडकवत नाही! नाती आली की मानपान येतो.... मैत्रीत मोकळेपणा असतो! सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैत्री गरजे प्रमाणे त्या-त्या नात्यांची जागा पण घेते! ☺️

तर अशी ही आमची २० वर्ष जूनी (?) प्रत्येकवेळी नव्याने निभवणारी आमची मैत्री आता पुढच्या पिढी पर्यंत पोहोचली आहे!

अरे हो, आमच्या लग्नात ह्यांच्या कुटुंबातील कोणी नव्हतं म्हणून सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्ण विधिवत लग्न लाऊन देणारी हीच....अर्थातच आम्हाला काहीही माहिती होऊ न देता सगळं यथासांग पार पाडण्यासाठी तिचा अभिषेक, माझा मेव्हणा रणजित, तिची छोटी बहीण दर्शना, तिचे जिजू ओम आणि त्याचे बाबा ही यात होतेच तिला पूर्ण साथ द्यायला! 

तर अशीही दिप्ती, गीताची शाळेतली मैत्रिण, आता हक्काने आमच्या पूर्ण कुटुंबाचा भाग झाली आहे!

मित्र-मैत्रिणींनी, नात्यांनी श्रीमंत होत असलेला तुमचा मित्र,
-गोसाव्यांचा योगेश

Comments

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३