Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018

पहिली...शेवटची!!

पहिलीच पण शेवटची! पहिलीच मी, पहिलाच तू तरीही असा कसा शांत तू?   पहिलाच पावसाळा आणिक तो उन्हाळा,   तरीही मला अजून त्यांचाच लळा? कधीतरी दे तू पुन्हा पहिलेच आठव, कधीतरी रितेकर पुन्हा तेच मार्दव!   तेंव्हा नकोसा वाटणारा तुझा तो चेहरा,   आणि आता हवासा तुझाच आसरा! का मी अशी निशब्द आणि निर्विकार? का तू पुन्हा झंकारलेली सीतार?   पहिलीच मी, गोंधळलेली!   पहिलाच तू, बावरलेला! पुन्हा ती पहिलीच सांजवेळ! पुन्हा तोच, आपला शेवटचा मेळ! --योगेश गोसावी १९ मार्च, २०१८