का कळेना?
का कळेना आज हे वादळ कुठून आले?
का कळेना आज हे काहूर का मनी दाटले?
मनात माझ्या आज मी हे वेड कुणाचे पाहतो?
का कळेना तुज वाचून मी रिता कसा राहतो?
नेहमीच येणारा पावसाळा का असा लांबला?
ग्रीष्माचा हा तडाखा थंडीत का लागला?
तुज वाचून प्रिये मी असा सैरभैर झालो,
तुझ्याच एका होकरासाठी दिन-रात्र असा लढलो!
येशीलना तू आता एकदा माझ्या अंतिम समयी,
पुन्हा भेटण्यासाठी आता मी उरतच नाही.
का कळेना अजुन मला तुझी ही प्रीत?
का कळेना मलाच माझी जगण्याची ही रीत?
--१५ फेब्रुवारी २०१३
Comments
Post a Comment