नुकत्याच उमललेल्या कळीला,
काही कळेना!
नुकत्याच पंख फुटलेल्या पाखराला,
काही कळेना!
वेडीच ती, आपल्याच दुनियेत,
रितभात त्यांना अजून उमजेना!
म्हणून का तू असा पाशवी होणार?
लाघवी सौंदर्य त्यांचे उगा ओरबडणार?
त्यानी दिले नयन हे पाहण्यासाठी,
त्यानीच दिले हात हे नेहमीच देण्यासाठी!
का मग नजर तुझी नेहमीच काही शोधते?
का तुझे हात हे नेहमीच घेऊ पाहते?
कोठे जाशील वेड्या तू हे वेड घेऊनी?
येतील तुझेच तुझा कधी काळ बनूनी!
नयन तुझे, हात तुझे बघ एकदा वापरूनी,
तोच देईल सर्व काही तुझाच होऊनी!
--योगेश गोसावी
१५ फेब्रुवारी २०१८
Comments
Post a Comment