पाहिले ना मी तुला वासनेत माझ्या कधी,
पाहिले जेंव्हा तुला हृदयात पाहिले आधी!
दुदुंभती वासनेच्या तोफा या नेहमी मनामध्ये,
पाहतो तुला अन आपसूक येतो राम हा मनामध्ये!
शरीराचा दर्प तुझ्या छेडतो या सैताना,
डोळ्यातील मार्दव मांडते शरीरसुखाच्या वल्गना!
का कोण जाणे कधी घडला नाही काही गुन्हा,
नकळत कर नाही उठला धरावया हा चंचल पन्हा!
धीर पण माझा जणू पुकारतो गीतेतील पुरुषोत्तमा,
नाही झिडकारला कधी या मनाच्या संयमा!
राधा, सीतेची जणू सखी तू अवतरली या भूमंडळा,
मी ही देईन दाखवून आहे लल्लाटी पुरूषोत्तमाचा टिळा!
-योगेश गोसावी
१० सप्टेंबर २०१८
Comments
Post a Comment