मी असाच एकटा....एका बाकावर! समोर असलेली हिरवी गर्द टेकडी आणि आजूबाजूला मधूनच येत असलेले पक्षांचे आवाज! निश्चितच सुखावून टाकणारी अनुभूती.....पण खरंच हे अनुभूवायला इतकं सोप्प आहे? छे! मुळीच नाही!
ते अनुभुवायला तुम्हांला हवी असते एक अद्भुत शक्ती! दूर्लक्ष करण्याची! होय बरोबर वाचलं तुम्हीं, दूर्लक्ष करण्याचीच! ईतकी सहज आणि सोप्या पद्धतीने अशी निवांत जागा शोधायला गेलात तर आज कोणत्याही शहरातून तुम्हांला निदान ५०-६० किलोमीटर दूर जावं लागेल! ते जर नको असेल तर ह्या शक्तीची उपासना करा!
आजूबाजूला असलेले विविध आवाज....गाडी, वातानुकूलित यंत्रणा, गाड्या, मोबाईल, अवास्तव मोठ्या आवाजात बोलणारी सभ्य (?) माणसं या सर्वांपासून दूर गेलात की आपल्या घराजवळ, ऑफिसजवळ इतकंच काय जेथे बसताल तेथे अशी निवांत जागा सहज मिळेल!
आपल्या आवडत्या गोष्टीकडे सगळ्या इंद्रियांना बघायला भाग पाडा आणि पहा! मस्त निवांत वाटेल!
चला तर मग करा सुरू तुम्ही आराधना, दुर्लक्षित केलेल्या या अनोख्या शक्तीची, नको त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची!😇
--योगेश गोसावी
३० जुलै, २०१८
Comments
Post a Comment