Skip to main content

वारा

वातानुकूलित कार्यालयात बसून खिडकीतून बाहेर बघितल्यावर वाऱ्याबरोबर बेधुंद होऊन झुलणारी झाडं दिसली आणि स्वतःवरच कीव आली!

तडक उठलो आणि बाहेर पडलो! मस्त! निसर्ग नेहमी आपल्याला प्रफुल्लित करण्यास तयार असतो पण आपण मात्र आपल्याच दुनियेत स्वतःला गुरफटून घेतलेलं असतं! पाय आपोआपच चहा कडे वळाले! ढगांनी प्रेमाने सूर्यालाही कवटाळून घेतल्यानें वाऱ्यात आपसूकच एक गारवा आलाय आणि अशा वातावरणात थोडंस लिंबू पिळलेला कोरा चहा!अहाहा, स्वर्गीय आनंद!

आत्ताच कार्यालयात पोहोचण्याची वेळ गाठण्यासाठी लगबगीने चाललेल्या काही ललना जवळून गेल्या! त्यातली एक या वाहणाऱ्या वाऱ्याला वैतागलेली होती! कीव आली बिचारीवर....कारण वाऱ्या बरोबर उडनाऱ्या तिच्या केसांमुळेच खरतर ती जास्त छान दिसत होती! मला वाटलं वारा बिचारा, तिचं हे बोलणं ऐकून जरा ओशाळेल आणि थांबेल ही कदाचित! पण छे!! तो आज खट्याळ झालाय, अजूनच जोरात वाहतोय!

सहसा स्वतःच्या पेहरावाला कधीही न सावरणारे सगळेजण हटकून आज स्वतःला सावरताना दिसताहेत. या सगळ्या मध्ये मात्र आत्ताच एक आनंदाने बेफाम वाहणारा झरा दिसला....शाळेतून घरी निघालाय वाटतं..... दररोज पळत असतो पण आज मात्र खूपच निवांत आहे स्वारी! कारण ही तसंच आहे, त्याच्या हातातील भिंगरी आज आपसूकच फिरतीये!

वारा, वाहतोय आपल्याच मस्तीत आणि ईथे प्रत्येकजण येनकेन प्रकारे त्याचा आनंद लुटतोय!

तुमचं काय?

-योगेश गोसावी
२ ऑगस्ट, २०१८

Comments

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३