वेड
वेड्या मनाची वेडी स्वप्ने
शहाण्यांच्या जगात घेऊन फिरताना
उगाच वेडावल्या सारखे वाटते.
शहाणे कावळे
वेडावलेली फुलपाखरे हाकलू पाहतात.
आणि तेथूनच धुमारे फुटणाऱ्या मनाला
वास्तविकतेच्या झळा होरपळू लागतात.
वेड मन पुन्हा शोधू पाहत अजून एक वेड मन.
सापडलं कधी चुकून तर पुन्हा चक्र सुरू राहत.
वेड्यांचा दुनियेत उनाड बागडणाऱ्या मनाला,
शहाण्यांच्या दुनियेत होरपळत राहावं लागतं!
©गोसाव्यांचा, वेडा योगेश
१ ऑगस्ट, २०२४
Comments
Post a Comment