नुकतंच जन्मलेलं पिल्लू आता घरट्याबाहेर पाहू लागलं,
उंच उडणाऱ्या पालकांना बघून उडण्याची आस बाळगू लागलं!
आस मनाची ईतकी की घरट्यातच पंख फडफडू लागले,
अवस्था त्याची बघून आई बापही घाबरू लागले!
कधी कोण जाणे काय होईल घात शंका ही आली,
बाळाच्या आकांक्षाना थोपवण्यात शक्ती खर्च झाली!
काय करावं त्यांना काही सुचेना,
नको त्या वयात काय करेल बाळ काही त्यांना कळेना!
धीर करून शेवटी बाबा पुढे झाला,
घेऊन त्याला सोबत बाहेर उभा राहिला!
सोबत त्याला घेऊन धडा सुरू झाला,
पंखां आधी तो त्याचे मन तयार करू लागला!
बाळाला ही कळले नुसते पंख असून चालणार नाही,
उडण्याची हौस नुसती ईच्छा असून भागणार नाही!
काही गोष्टी या योग्यवेळीच होणार,
तेंव्हाच तर त्यांचे मोल आयुष्यभर टिकणार!
परतले घरट्यात ते गोजिरे घेऊन हा धडा,
आई सांगते योग्य वेळीच होतील योग्य गोष्टी बाळा!
-योगेश गोसावी
२९ऑक्टोबर, २०१९
Comments
Post a Comment