अवघड वाटा
मृत्यू पण आता मित्रा सारखा वागतो,
जरा आठवण काढली की पुढे उभा राहतो!
प्रेमापेक्षा आजकाल मरण झालयं सोपे,
प्रेमाला तरी आता कोणते गाव राहिलंय कोठे?
प्रत्येक जण याच्यापासून लांब पळू पाहतोय,
सरते शेवटी उपाय म्हणून यालाच मिठीत घेतोय!
एकदा तरी थोडा विचार करून पाहा,
मरायचं आहे एकदाच, रोज थोडं जगून तरी बघा!
मरण आणि मारण्याच्या आहेत सोप्या वाटा,
एकदा तरी अंगावर घ्या अवघड प्रेमाच्या लाटा!
-योगेश गोसावी
१० डिसेंबर, २०१९
Comments
Post a Comment