लोक काय म्हणतील हाच विचार येतो,
नाहीतर मी सुद्धा हिमालय रोज पालथा घालतो!
येता जाता मी सुद्धा अनेक गड जिंकतो,
विचार यांचा मनात आला की तलवार म्यान करतो!
आईला वंदन करताना असतो मी राजा,
सरदार बनतो बघून सारी बाहेरची प्रजा!
काय माहीत यांचं हे म्हणणं कधी थांबणार?
माझ्या मनीचे हे पाखरू कधी पिंजरा तोडणार?
असंख्य खून केलेत यांच्या ह्या बोलण्याने,
पण म्हणूनच तर धरलंय मला माझ्या लेखणीने!
-योगेश गोसावी
३ जून, २०१९
Comments
Post a Comment