पझेसिव्ह
हे आजचं नाही वर्षानुवर्षाचं आहे,
पझेसिव्हनेस वरून भांडण आमचा छंद आहे!
पुरुषी भावनांचा खेळ तिला म्हणे माहीत आहे,
घरातला हा पुरुष मात्र बाहेरच जग ओळखून आहे!
मी मात्र स्वतःला कलियुगातील राम समजतो,
पर नारीशी वागताना मोकळेपणाने वागतो!
तिलाही माहिती आहेत स्त्री हृदयाचे खेळ,
म्हणून तात्पुरता सटकतो मग आमचा हा मेळ!
हे ही माहीत आहे दोघेच आहोत एकमेकांना,
तरीही ही फोडणी पुरते १-२ दिवसाच्या अबोल्याला!
हा पझेसिव्हनेस म्हणजे आहे तरी काय?
गूढ या प्रश्नाचं उत्तर आम्हां कधी मिळेल काय?
मला तर वाटतो हा विश्वास परक्या धुर्ततेचा,
तुम्हांला वाटू शकेल एकमेकांच्या अविश्वासाचा!
उत्तर ज्याने त्याने आपापलं सभोवताली शोधावं,
नाहीच सापडलं तर प्रेमाचं इंजेक्शन अजून जोरात टोचाव!
-योगेश गोसावी
४ जून, २०१९
Comments
Post a Comment