नकोत रुसवे फुगवे, नको तो अबोला!
समजून घ्या एकमेका,अवघड पुढल्या वाटा!
रागावला एक तर दुसरा राहु द्यात शांत,
प्रवास होईल तुमचा मग हा निवांत!
प्रेमापाई आला आहात एका वाटेला,
कधी वेगाने कधी संथ पोहचाल पैलतीराला!
सगेसोयरे येता घर राहील प्रफुल्लित,
आपसूकच मन तुमचे होईल उल्हसित!
उमलते राहो सदैव तुमचे प्रेमाचे पर्व,
ह्याच शुभेच्छा देतोय आम्हीं मैत्र सर्व!
-योगेश गोसावी
८ जून, २०१९
Comments
Post a Comment