आभाळ भरून येताना आणि तू जवळ नसताना,
काहूरत माझं मन नेहमीच कातरवेळ सरताना.
नसताना तुम्हीं मन विचार तुमचाच करत,
कधी येऊन बरसणार हाच ध्यास घेऊन बसत!
आल्यावर तुम्हीं मात्र माझी धांदल उडवता,
काय करायचं होतं हेच विसरायला लावता!
मी विसरतो सगळं आणि चिंब होऊन जातो,
प्रेमाचा तुमचा वर्षाव अलगद मनात झेलतो!
ग्रीष्मा नंतर येऊन तुम्हीं आपसूक आपले वाटता,
आपलेच झालात अस वाटतानाच अजून थोडं तरसवता!
कसं जमत तुम्हांला अस चक्रात मला अडकवण?
दरवर्षी या प्रियकराला थोडं का होईना सतावण!
-योगेश गोसावी
६ जून, २०१९
Comments
Post a Comment