स्वभाव स्वभाव म्हणजे आहे तरी काय? स्वतःला भावणारे वागणे तर नव्हे ना? माहीत नाही आणि माहिती होऊनही काही उपयोग नाही! पूर्वज सांगतच आलेत की त्याला काही औषधच नाही!
मग आता यावर उपाय तरी काय? आई म्हणायची, नाही नाही आई नाही! सर म्हणायचे, पाचवीत होस्टेल जीवनाची सुरुवात झाली तेंव्हा! त्यांनी ओळखलं की हे प्रकरण लहरी आहे की नाटकी? आडमुठे? जे काय वाटेल ते, असो! पण त्यांनी मी वेगळा आहे ओळखले होते हे तर नक्की! त्या ओळखण्याचा मला फायदाही झाला आणि तोटाही! फायदा व्हायचा जेंव्हा त्यांना कळायचं की याला कधी/कोठे रागवायचे/मारायचे (कधीतरी 😊) नाही ते आणि तोटा हा व्हायचा की त्यांना मला बघूनच कळायचं की काय खरं आहे आणि खोटं!
आयुष्याच्या कित्येक टप्प्यावर कित्येकांना हा आवडला ही आणि त्यांना पटेनासा झाला की नावडता ही झाला! कारण काय तर त्यांच्या कडे तरी कोठे आहे औषध!! 😂
मग आता काय? उत्तर असतेच ज्याच्या त्याच्या जवळ...आपापलं उत्तरही वेगळं! ते ही स्वभावाप्रमाणे तुम्हांला पटेलच याची काय खात्री! तेंव्हा शोधा आपापलं!! 😉
-योगेश गोसावी
२ एप्रिल २०१९
Comments
Post a Comment