ऐकशील ना?
आलास मनाप्रमाणे पण निघायचं का वळत नाही?
नेहमीचं झालयं तुझं आता हे लहरी वागणं,
हवं तेंव्हा न येणं आणि नको तेंव्हा जाणं!
घरचे आताशा मला तुझ्यासोबत जाऊ देत नाही,
करशील तांडव कधी याचा आता भरोसा नाही!
लागलंय का काही तुला कोठे खोलवर आत?
की नुसताच आळवतोय पुन्हां जुना पहाडी राग?
तिला पण आताशा तू नकोसा झालायं,
तुझ्या ह्या पाघळेपणाचा तिला संताप आलाय!
तुला म्हणून सांगतो ऐक माझं लेका,
हाताला कोणी धरण्या आधी आपण पकडव्यात वाटा!
प्रिय पावसा, ऐकशील ना रे या आमच्या हाका!!
-योगेश गोसावी
१ नोव्हेंबर, २०१९
Comments
Post a Comment