Skip to main content

रंग मावळतीचे

रंग मावळतीचे

मावळतीला रंग उधळतो मित्र नव्हे हा सखा,
निशा आणते मग आपला काळा शालू नवा!

आपसूक समेटून घेई ती हा रंगदार विखुरलेला पन्हा,
जेणेकरून नव सलाम द्यावा आपण दिवसाला पुन्हा!

निसर्ग सांगतो नित्यचक्र हे असेच चालू ठेवा,
कधी हर्ष तर कधी दुरावा हवाच रे आपल्या मना!

रंग मनाचे विखरुद्या तुम्हीं या क्षितिजावर,
पुन्हां निशेची चादर घ्या अन पसरा मग त्यावर!

खेळ हा नित्य खेळती जे प्राणी मनभर,
जगणे त्यांचे होईल गाणे सांगे तो ईश्वर!

-योगेश गोसावी
२८ नोव्हेंबर, २०१९

Comments

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३