का सारखे हे मला असे स्वप्न यावे?
निघोनी घरातुनि मी तुजकडे यावे!
निशिगंधाचा धुंद गंध काय मला सांगतसे?
रात्रीचा हा आभास कोठे मला नेत असे?
पायाची गती आता काहीशी मंदावली,
चांदण्याची शाल आता काहीशी उलगडली!
का मी असा आज सर्व संपावयास निघालो?
तुझ्या घरचा रस्ता आज कसा मी विसरलो?
-योगेश गोसावी
२२ जानेवारी, २०१३
Comments
Post a Comment