Skip to main content

नटरंग -पहावा असा

नटरंग....कलाकार, अतुल कुलकर्णी या गोष्टीं साठी कालचा रविवार राखून ठेवला होता.
उत्कृष्ट अभिनय, ज्या साठी गेलो होतो ती गोष्ट नक्कीच पहावयास मिळाली. अगदीच सोपा, जुना आणि दुर्ल्कशिलेला विषय छान मांडला आहे. माझ्या मते कुठलाही पिक्चर हा कधीच परिपूर्ण नसतो. एक तर १००-२०० लोक तो बनवतात आणि कित्येक हज़ार लोक तो बघतात. कसे काय प्रतेकाचे मन जिंकायचे? त्या साठी पिक्चरचे यशापयश त्याचा सम्पूर्ण पणे किंवा एकत्रित परिणाम कसा होतो त्या वर ठरवावे.
हा विषय जुना यासाठी की तो आधारित आहे, तमाशातिल कलावंताचे झालेले दुर्लक्ष.......समाज, सरकार, कुटुंब अशासर्व बाजूंनी!
आपण सहज पणे एखाद्याचे यश बघतो पण त्या बरोबर आलेल्या आणि न चुकनऱ्या वेदना.....त्या कड़े आपण एक तर दुर्लक्ष करतो किंवा सहज म्हणतो, "आता एवढ हव तर थोड सोसल पाहिजेच ना?" या आपल्या विचारांना परत एकदा विचार करायला लावणे हेच मी नटरंगचे यश मानतो.
अतुल कुलकर्णी आणि टीमचे आभार.......एक छान प्रयत्न! 

Comments

  1. दोन्ही लेख खूपच छान लिहिले आहेस..
    तसा पाहायला गेला तर तुझया मराठी लिखाणाच्या पुराव्याची मला गरज नाही...
    मी ते ३ वर्ष अनुभवलय :) ....आणि आत्तापण आधून मधून सुरू असत..
    पण तरीही तुझ खूप खूप अभिनंदन हा ब्लॉग सुरू केल्याबद्दल....
    तुझी स्वतहाची अशी ही एक नवीन जागा आहे....
    या जागेचा तू पुरेपूर वापर करावा अशी सदीछ!!
    HAPPY BLOGGING!!!

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलय नटरंग बद्दल. अजून थोडीशी माहिती टाक ना, म्हणजे पहायला जाण्याचे कष्ट करायची गरज नाही. :)
    आत्ताच जीमेल वर आले तेव्हा कळलं की आपण ब्लॉग लिहिला आहे ते. मग म्हणलं जरा अनुभवी लोकानी अभिप्राय दिले तर तुझा उत्साह वाढेल.. हे हे.. एकदा टाळ्या होउन जाउदेत वाचकहो..:P

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३