Skip to main content

सत्ता -स्वामिंच्या नजरेतून

 काल, १२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती, बऱ्याच थोड्या जणांना माहित असेल! कारण काल एक ही चैनल वर ही न्यूज़ आली नाही मग आपल्या सारख्या लोकांना कस माहित होणार? बरोबर ना? असो!
स्वामिंच्या पत्रां मधील काही भाग माझ्या वाचनात आला होता आणि काल त्यांच्या जयंती निमित्त पुन्हा तो भाग वाचनात आला, विचार केला तो तुम्हां सर्वांना देखिल माहित असावा त्या साठी आजचा हा लेख.

स्वामिंच्या मते, "सत्ता ही चार प्रकारचे लोक (वर्ण) चालवतात. प्रत्येक प्रकारचे काही फायदे आहेत तसे काही तोटे ही आहेत.
१. ब्राम्हण
ह्या लोकांच्या शासन व्यवस्थे मधे समाज वंश परम्परेवर आधारलेला असतो. त्यांचे आणि त्यांच्याच वंशाच्या लोकांचे हित सम्बन्ध जपले जातात. ज्ञान संपादन आणि दान दोन्ही त्यांच्याच मर्जिने चालते परन्तु त्याच वेळी विज्ञानाच्या सर्व शाखांची पायभरनि पण होत असते हें महत्वाचे. हा वर्ग आपल्या मनाचा विकास करतो कारण मनाच्या द्वारेच तो शासन करत असतो.

२. क्षत्रिय
क्षत्रियांची राजवट ही जुलूम जबरदस्तीची आणि निष्ठुरतेची असते. परंतु ते संकुचित स्वभावाचे नसतात आणि त्यांच्या राजवटीत कला आणि सामाजिक संस्कृती या गोष्टींचा उत्कर्ष होतो.

३. वैश्य
वैश्यां कड़े प्रजाजनांना शांतपणे चिरडून टाकण्याचे व त्यांचे रक्त शोषण करण्याचे सामर्थ्य असते, त्यामुळे यांची राजवट भयंकर असते. तिच्यापासून फायदा हा की, वैश्य हे स्वत:च सर्वत्र जात असल्यामुळे पूर्वीच्या दोन राजवटीत संकलित झालेल्या कल्पनांचा व विचारांचा प्रसार करण्याचे कार्य ते चांगल्या रीतीने करतात, वैश्य हे क्षत्रियांपेक्षाही कमी संकुचित स्वभावाचे असतात. परंतु त्यांच्या राजवटीत संस्कृतीच्या अधोगतीला प्रारंभ होतो.

४. शूद्र
सरतेशेवटी शूद्रांची राजवट येईल, भौतिक सुखविलासांचा प्रसार हा या राजवटीचा फायदा होईल. संस्कृतीची अवनती (कदाचित) हा तिच्यापासून तोटा होईल. सर्वसाधारण शिक्षणाचा फार प्रचंड प्रमाणात सर्वत्र फैलाव होईल हे खरे. तथापि असाधारण प्रतिभावंतांची संख्या कमी कमीच होऊ लागेल."

अशा प्रकारे स्वामिजिंनी सत्ते चे वर्गी कारण केले आहे. पुढे ते म्हणतात, "ब्राह्मण काळातील ज्ञान-विज्ञान, क्षत्रिय काळातील संस्कृती, वैश्य काळातील प्रसारक प्रवृत्ती आणि शूद्र काळातील समतेचा आदर्श ही सगळी गुणवैशिष्टय़े ज्या राज्यात शाबूत आहेत, परंतु त्यातील दोष जिथे नाहीत असे एखादे राज्य जरी निर्माण करता आले तरी ते आदर्श राज्य ठरेल. परंतु ते शक्य आहे काय? तथापि पहिल्या तिघांची पाळी संपली आहे. आता शेवटच्यांची म्हणजे शूद्रांची पाळी आली आहे. त्यांची राजवट येईलच. तिला कोणी थोपवू शकणार नाही."

मला असे वाटते आहे स्वामींचे म्हनने पूर्ण खरे आहे आणि आता आपण सगळे भौतिक सुखा पाठी मागे लागलो आहोत आणि आपले राजकारणी शुद्र आहेत ज्यांना फ़क्त भौतिक सुखा साठी सत्ता हवी आहे.............आपणास काय वाटते ते जरुर कमेन्ट मधे लिहा....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३