काजळलेल्या या धुंद रात्री,
अवचित तुला आठव येईल आहे ही खात्री!
हा धुंद काळोखच मदत करेल तुला मला,
सावरून घेऊ मग मस्तीत वाहणाऱ्या मना!
वारा पण का उगाच सैरावैरा वाहतो,
सांभाळनाऱ्या जीवांना हा असाच भरकटत नेतो!
भरकटलेली ही मने विस्कटत मात्र नाहीत,
एकमेकांच्या कुशीत पण नीट स्थिरावत नाहीत!
कशी कोण जाणे पहाट मात्र परीक्षा घेते,
विरहाच्या क्षणांची मग उगाच शर्यत लागते!
विरहाचा सारथी भास्कर मग नकोसा वाटतो,
रात्र आणि तू जवळ आणणारा चांदवाच मग सखा भासतो!
--योगेश गोसावी
१६ फेब्रुवारी २०१८
Comments
Post a Comment