Skip to main content

चाहूल .....दिवाळीची

नमस्कार मंडळी!

कसे आहात सगळे? दिवाळीची चाहूल लागली असेल ना आता?

मुलांच्या परीक्षाही सुरू होत असतील! त्यांच्या अभ्यासाचं टेन्शन आपल्याला आणि ते मात्र सुट्टीचं प्लानिंग करत असतील मनात! आपण ही तेच करायचो ना?

आठवतंय का काही? जरा ताण देऊन बघा, नक्कीच आठवेल! किल्ला करायचा की नाही? घरचे नवीन कपडे घेणारेत की नाही? फटाके कितीचे घ्यायचेत? फिरायला जायचं आहे का? जाणार असल्यास कोठे? की आपल्या कडेच कोण येणार आहे?

माहीत तर काहीच नसायचं पण या गोष्टींचा किती विचार करायचो आपण!

त्यात परत दिवाळीचा अभ्यास! मी तर पहिल्या २-३ दिवसात संपवायचो! म्हणजे सुट्टी कशी सुटसुटीत जायची 😁

घरचे सगळे काही ना काही कामात असायचे आणि त्यांना मदत करायच्या निमित्ताने आपण त्यांची कामे वाढवून ठेवायचो, आपल्या फर्मयाशी पण सांगायचो!

आठवलं असेल ना? तर मग आपल्या मुलांनाही हे सगळं एन्जॉय करूद्यात....थोडा त्रास देउद्यात! अगदीच मोकळा हात आपण देत नाहींच पण मग एकदम कडक शिस्त पण नको!

दिवाळी येत आहे त्या बरोबर आपलं बालपण पण येईल आपल्या मुलांच्या रूपाने! चला तर मग दिवाळीच्या आणि आपल्या लहानपणाचं स्वागत करायची तयारी सुरू करूयात! ☺

-योगेश गोसावी*

Comments

  1. True.....Kids bring back our childhood...And diwali is truly special.small sweet article

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३