Skip to main content

अंगठा (लाईक)

अंगठा (लाईक)

अंगठे (लाईक) दाखवून दाखवून थकली दुनिया सारी,
दोन शब्द बोलायलाही पडतंय आता भारी!
मनातल आता सगळं मनातच लपून राहतं,
वेळ निघून गेल्यावर डिप्रेशन धावून येतं.

दिलखुलास दाद आजकाल फार कमी मिळते.
मिळालीच कधी तर मनात जपून राहते.
अशा लोकांना आता मी जपतोय,
अफाट लोकसंख्ये मध्ये लोकांना शोधतोय.

चुकलं काही कोणाचं तर जरूर त्याला सांगा,
आवडलं कधी काही तर दोन शब्दात बोला.
परतून येतात जेंव्हा आपलेच काही शब्द,
आयुष्यातील दुःख होतात काही काळ स्तब्ध!

बोलतं व्हावं तुम्हीं म्हणून हा एक प्रयास.
नाहीतर लावाल एका अंगठ्यासाठीचा (लाईक) कयास!

-गोसाव्यांचा योगेश
२७ एप्रिल, २०२१

Comments

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३