ध्वज
करितो आम्हीं ध्वजवंदन संध्या समयी आमुच्या,
प्रभात व्हावी तुमची पायथ्याशी याच्या!
धर्म कोणता आणि कोणती जाती पाती,
भारतीय धर्म विसरावा इतकी झडली का मती?
ऊंच ऊंच फडकत ठेवा तिरंगा आपुला,
धारातीर्थी शुरांना तो स्वर्गातूनही दिसावा!
अनंताच्या प्रवास समयी निश्चिंत करा आम्हां,
एकोप्याने रक्षीत राहा या भारत देशा!
-गोसाव्यांचा योगेश
१४ ऑगस्ट, २०२२
Comments
Post a Comment