आज तिचा दिवस
आज म्हणे तिचा दिवस, तिच्यासाठी काही तरी करा!
वर्षभर जिचं ऐकतो, तिचं आज परत गुणगान करा!
सांगतो तुम्हांला कंपनीत पण असचं नेहमी होतं.
वर्षभर ज्याचं (बॉस) गुणगान करावं त्याचंच भल होतं!
आमच्यासारखे कित्येकजण नुसते वाट पाहतात,
आपलाही दिवस येईल कधी हीच आस धरतात.
लिंग, धर्म, जात आमची कोणी पाहू नये,
माणूस आहे चांगला एवढं पण का पुरु नये?
स्त्री पुरुष तरी तुम्हीं का अजूनही विभागता,
त्यानेच बनवलेले दोन ध्रुव चुंबकाचे का असे तोडता?
फुल उमलायला ही व्हावं लागतं परागांचं मिलन,
तिचाच होईल प्रत्येक दिवस कळेल जर हे लेखन!
-गोसाव्यांचा योगेश
८ मार्च, २०२१
Comments
Post a Comment