मी, माझ्यापुरता!
कधी अचानकच अशी उसळी मारून आठव दाटते,
मन मग आपसूकच माळावरच्या चाफ्याशी थांबते!
बोललो नव्हतो एक शब्द ही जेंव्हा, भरूपर सांगून गेलो होतो!
पाठमोऱ्या तुझ्या आकृतीला पाहून जगाची रित शिकलो होतो!
शिकवलं तेंव्हाच तू, स्वतःसाठी जगायला.
वाचवलं तेंव्हाचं माझ्या या भावनिक मनाला!
राग नव्हे, दुःख ही कधी झाले नाही.
आभार तुझे मानताना आजही मी थकत नाही!
मी उरलोय आता फक्त माझ्यापुरता!
जग म्हणतेय स्वछंदी आहे, नाही कोणत्या कामाचा!
-गोसाव्यांचा स्वछंदी योगेश
१० मार्च, २०२१
Comments
Post a Comment